हे भाषांतर केवळ माहितीच्या उद्देशाने दिले आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या कायद्यांतर्गत Plain Partnership मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केलेल्या, किंवा अशी भागीदारी स्थापन करू इच्छिणाऱ्या, इंग्रजी न बोलणाऱ्या व्यक्तींसाठीच ते आहे. ते उपलब्ध करून देणे म्हणजे युनायटेड किंगडमखेरीज इतर कोणत्याही अधिकारक्षेत्रात व्यावसायिक क्रियाकलाप करणे नव्हे. केवळ इंग्रजी आवृत्ती कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे आणि कोणत्याही विसंगतीच्या बाबतीत तीच ग्राह्य धरली जाईल.